मराठी सिनेसृष्टीतील एक युवा दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. या अष्टपैलू दिग्दर्शकाचा आज वाढदिवस. मराठी सिनेसृष्टीतील सिनेमांचं त्यांनी त्यांच्या युवा नजरेतून रुपचं पालटून टाकलं आणि बॉक्स ऑफिसवर एक नवा पायंडा त्यांच्या सुपरहिट ‘टाईमपास’ सिनेमामुळे पडला.
अॅडमेकर आणि सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी असलेल्या रवी जाधव यांनी ‘नटरंग’ या तमाशाप्रधान सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मुळातच क्रिएटिव्ह असणारे रवी जाधव नेहमीच विविध विषयांसह प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चाकोरीबाहय विषयामुळे ‘न्यूड’ सिनेमाला अनेक वादांना सामोरं जावं लागलं होतं.
नटरंग सिनेमा हा तमाशा प्रधान संस्कृतीवर बेतला आहे. यात तमाशातील पुरुषाची व्यथा मांडण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे. 2009 मध्ये उत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार नटरंगने प्राप्त केला. या सिनेमात अभिनेता अतुल कुलकर्णीने प्रमुख भूमिका साकारली.
बालगंधर्व सिनेमात सुबोध भावेचा अभिनय आणि रवी जाधव यांचे अप्रतिम दिग्दर्शन असा सुरेख मेळ जमून आला.
एका वेगळ्या वाटेवरचा सिनेमा रवी जाधव यांनी बीपीद्वारे केला. आजच्या किशोरवयीन मुलांमध्ये सेक्सचे आकर्षण आणि त्याबाबत आवश्यक असलेले शिक्षण मोठ्या पडद्यावर सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला.
एका अल्लड वयातली प्रेमकथा टाईमपास सिनेमाने मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रियतेचे सारे उच्चांक मोडले. बॉक्स ऑफिसवर तर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकल्याचा दाखला दिला.
एक हटके आणि् प्रकाशझोतात न आलेला विषय पडद्यावर मांडण्याचं धाडस रवी जाधव यांनी न्यूड सिनेमाद्वारे केलं. यासाठी त्यांना अनेक वादांना सामोरं जावं लागलं तरी या सिनेमासाठी त्याचं प्रचंड कौतुक करण्यात आलं.
मराठी पिपींगमूनतर्फे हरहुन्नरी दिग्दर्शक रवी जाधव यांना वाढदिवसानिमित्त आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !