By  
on  

‪हिरो अगदीच घेणार मनावर अन् व्हिलन पडणार तोंडावर…

अल्पावधीतच झी मराठीवरील तुला पाहते रे ही मालिका लोकप्रियतेचे उच्चांक गाठते आहे. वयातील अंतर झुगारुन सुरु झालेली एक भाबडी प्रेमकथा असा कदम हटके विषय घेऊन ही मालिका सुरु झाली आणि प्रेक्षकांनी तिला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लवकरच या मालिकेत खुपच इंटरेस्टिंग आणि हवंहवंसं वाटणारं एक वळण येणार आहे.

साधी अल्लड ईशा निमकर आणि तिच्यापेक्षा वयाने मोठे व्यावसायिक विक्रांत सरंजामे यांच्यातील मनातलं प्रेम ओठांवर काही केल्या येत नाही. दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतायत पण एकमेकांसमोर मात्र अद्याप कबुली देत नाहीत. तर इथे बिपीन टिल्लूसोबत ईशाचं लग्न ठरलंय आणि तिच्या लग्नात मदत म्हणून मि. सरंजामे निमकर परिवाराला सर्वोतपरी मदत करण्यासाठी सज्ज आहेत. बिपीन आणि ईशाच्या लगीनघाईत प्रत्येक प्रसंगी सरंजामे हजर असतात. टिंल्लू यांचा ईशाला सून करुन घेण्यामागे काहीतरी मोठा हेतू आहे, हा डाव आता सरंजामेंना चांगलाच कळलाय.

ईशाच्या लग्नानंतर सरंजामे इंडस्ट्रीकडून आपला वैयक्तिक आर्थिक स्वार्थ साधण्याचा कट उधळून लावण्याचं जबरदस्त प्लॅनिंग मालिकेचे नायक विक्रांत सरंजामे यांनी केलं आहे. त्यामुळे मालिकेत काय नाट्य घडणार आहे? ईशाच्या कुटुंबियांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली ते देणार का ? या सर्व प्रश्नांची उत्तर मालिका पाहताना मिळणार आहे.

https://www.instagram.com/p/BobyTIEAiOz/?taken-by=zeemarathiofficial

Author

Recommended

PeepingMoon Exclusive