By  
on  

मुंबई-पुण्याची लव्हस्टोरी झाली तीन वर्षांची; पाहा रोमॅण्टीक टिझर

मुंबईची मुलगी आणि पुण्याचा मुलगा ही कित्येकांच्या ख-या आयुष्यातील लव्हस्टोरी गौरी आणि गौतमच्या रुपाने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी मोठ्या पडद्यावर साकारली आणि पाहता पाहता ही लव्हस्टोरी आत्ता चक्क तीन वर्षांची झालीय. अहो ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या सुपरहिट मराठी सिनेमाचा ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ हा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारा असा टिझर नुकताच उलगडला.

मुंबई पुणे मुंबईच्या पहिल्या भागात मुंबईची गौरी आणि पुण्याचा गौतम यांची ओळख होऊन ते प्रेमात पडले तर दुस-या भागात त्यांच्या लग्नाची धामधूम अनुभवता आली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरमधून आता या दोघांच्या घरी एका गोड बातमीची चाहूल लागल्याचं कळतंय.पण यात नेमकी काय आणि कशी धम्माल पाहायला मिळणार याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. सिनेमाचे निर्माते संजय छाब्रिया, सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई-३’ च्या प्रदर्शनाची  घोषणा केली आणि सिनेरसिकांच्या आनंदाला उधाण आलं.

‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांनी लिहिले आहेत.

येत्या 7 डिसेंबर 2018 रोजी गौरी-गौतमचा ‘मुंबई पुणे मुंबई-3’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

https://youtu.be/PcI2puuLT2g

Author

Recommended

PeepingMoon Exclusive