भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत नसली तरी स्थिती चिंताजनक असल्याच्या अफवांना सध्या सोशल मिडीयावर खुप जोर धरला आहे. परंतु त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याच्या प्रकृतीबद्दल केवळ अफवा पसरत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.
'कृपया कोणीही लता दीदींच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवू नका. त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रर्थना करा' असं आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केलं आहे. चार दिवस उलटूनही लता मंगेशकर यांना रूग्णालयातच ठेवले आहे. रविवारी मध्यरात्री त्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Statement from #LataMangeshkar's team: We are as happy as you are to inform you that with all your prayers and best wishes, Lata didi is doing much better. (file pic) pic.twitter.com/y7Infws0W5
— ANI (@ANI) November 15, 2019