कोणत्याही सेलिब्रिटीच्या आयुष्यात चाहत्यांचं अनन्यसाधारण महत्व असतं. ते असतात म्हणून हे सेलिब्रिटी असतात. फॅनफॉलोविंग स्टार्सना प्रसिध्दीच्या शिखरावर जायला आणि टिकून राहायला नेहमीच मदत करतं. गोड गळ्याची गायिका सावनी रविंद्रचीही संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त फॅनफोलोविंग आहे.
एका छोटेखानी गेट-टू-गेदरमध्ये आपल्या चाहत्यांची सावनीने नुकतीच भेट घेतली. एका कॉन्टेस्टव्दारे काही भाग्यवान चाहत्यांना सावनीला भेटायची संधी मिळाली.
सावनी ह्या मिट-एन्ड-ग्रिट संदर्भात सांगते, “ह्या समारंभासाठी पुणे –मुंबईच नाही तर लातूर, सोलापूरहून अनेक चाहते आले होते. माझ्यावर त्यांनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आता अजून जबाबदारीची जाणीव झालीय. अधिकाधिक उतमोत्तम काम करण्याकडे आपण लक्ष द्यायला हवं, हे जाणवलं. तसेच ह्या मिट-एन्ड-ग्रीटला मिळालेल्या प्रतिसादावरून वर्षातून एकदातरी अशी मिट-एन्ड-ग्रीट चाहत्यांसाठी ठेवायचा निर्णय घेतलाय.”