By  
on  

Exclusive: महिलांवरील लैंगिक गैरवर्तवणुकीबद्दल सई ताम्हणकर म्हणते.......

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या गैरवर्तवणुकीच्या आरोपानंतर जणू काही बॉलिवूडमध्ये 'मी टू' चळवळीने पुढाकार घेतला असून आता अनेक अभिनेत्री आपल्यावर बेतलेल्या 'त्या' प्रसंगाबाबत सोशल मिडीयाच्या आधार घेऊन सांगू लागल्या आहेत. रोजच आरोपीच्या यादीत जाणा-या  कलाकरांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आलोक नाथ, रजत कपूर, अभिजीत भट्टाचार्य, विकास बहल, कैलाश खेर यांच्यावर आत्तापर्यंत लैंगिक गैरवर्तवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात या चळवळीने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.

लव सोनिया या मानवी तस्करीसारखं धगधगतं वास्तव मांडणा-या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकरणारी प्रतिभावान अभिनेत्री सई ताम्हणकर पिपींगमूनसह एक्सक्ल्युझिव्ह बातचित करताना, 'मी टू' चळवळीबद्दल म्हणाली, "मला असं वाटतं आता हीच योग्य वेळ आहे. महिला आपल्यावर झालेल्या अन्याविरुध्द आवाज उठवू लागल्या आहेत आणि आपल्यालासुध्दा थोडंस थांबून त्यांचं हे संपूर्ण म्हणणं ऐकून घ्यायला हवं. अशा प्रकारच्या घटनांबद्द्ल बोलायला खुप मोठं धाडस आणि हिंमत लागते. आता एकजूट होऊन या घृणास्पद गोष्टींना नष्ट करण्याची वेळ आलीय."

सई पुढे सांगते, "मला असं वाटतं, आपण सर्वांनी हे ऐकायलाच हवं. तसंच जुनी वैयक्तिक प्रकरणं आणि नातेसंबांधाच्या बदला घेण्यासाठी या चळवळीचा वापर करण्यात येऊ नये, ही कळकळीची विनंती. ही चळवळ योग्य दिशेने सुरु आहे आणि याचा मला फार आनंद होतोय."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive