By  
on  

नागराज मंजुळेंची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला हा आहे पहिला मराठी सिनेमा

सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाची चाहते अगदी आतुरतेने वाट पाहच असतात. त्यांचा लवकरच एक आगामी सिनेमा येतोय, हे वाचून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. पण या आगामी सिनेमाद्वारे नागराज प्रथमच निर्मिती व प्रस्तुती करत आहेत. त्यांच्या आगामी सिनेमाचं नाव 'नाळ' असं आहे. या सिनेमाचा टिझरसुध्दा उलगडला असल्याने या सिनेमाच्या विषयाबाबत प्रचंड कुतुहूल निर्माण झालं आहे.

नागराज मंजुळे यांनीच खुद्द या सिनेमाबाबत फेसबुक पोस्टव्दारे माहिती दिली. "माझा पहिला चित्रपट जो मी निर्माण केला नि प्रस्तुत करत आहे. माझा मित्र नि सैराटचा कॅमेरामन सुधाकर रेड्डीने हा दिग्दर्शित केला आहे. माझ्याच मनातली गोष्ट सुधाकर सांगतोय. नितीन वैद्य,विराज लोंढे,निखिल वराडकर, प्रशांत पेठे हे या निर्माणातील सोबती आहेतच. मंगेश कुलकर्णी आणि झी स्टुडिओज टीममुळेच हे शक्य होत आहे.झी स्टुडिओज, मृदगंध फिल्म्स नि आटपाट चिअर्स !!!", असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/TheZeeStudios/status/1050275219691036672

येत्या 16 नोव्हेंबर रोजी नागराज मंजुळे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला 'नाळ' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

https://youtu.be/Y0SiOdvEYRs

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive