By  
on  

बिग बॉस मराठीफेम हे दोन मित्र लवकरच एकत्र झळकणार

बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व चांगलंच गाजलं. प्रेक्षकांनीसुध्दा त्याला खुपच जबरदस्त प्रतिसाद दिल्या. या कार्यक्रमातील स्पर्धक कलाकारांच्या अनेक चांगल्या-वाईट बाजूंचे दर्शन घडले. पण बिग बॉसच्या घरातील स्पर्धक कलाकारांमधील मैत्रीचे किस्सेसुध्दा चांगलेच गाजले.

बिग बॉस मराठीत अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेता सुशांत शेलार यांची दोस्तीयारी मस्त रंगली. आता हे दोघं मित्र प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. रंगनील निर्मित ‘MR & MRS लांडगे’ या आगामी नाटकाद्वारे ही जोडी प्रथमच एकत्र झळकतेय. हे एक धम्माल विनोदी नाटक असल्याची कल्पना या नाटकाच्या पोस्टरवरुन येत आहे.

सुशांत आणि आस्ताद यांच्यासोबतच या नाटकात राजेश भोसले, परी तेलंग, मधुरा देशपांडे, रमा रानडे, अमर कुलकर्णी, अलका परब यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या नाटकाचं लेखन सुरेश जयराम यांनी केलं असून दिग्दर्शनाची धुरा विजय केंकरे यांनी सांभाळली आहे.

येत्या १३ ऑक्टोबर रोजी वाशीमधील विष्णुदास भावे सभागृहामध्ये कल्पना विलास कोठारी निर्मित ‘MR & MRS लांडगे’या नाटकाचा शुभारंभ होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive