By  
on  

अमृता खानविलकरचा हा फॅब लूक पाहिलात का?

मराठीसोबतच आता बॉलिवूडमध्ये आपलं स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अमृता खानविलकरला फॅब मॅगझिन या इंग्रजी मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकण्याचा मान मिळाला आहे. फॅब मॅगझीनच्या ऑक्टोबरच्या अंकाच्या कव्हरपेजवर अमृता अगदी दिमाखात विराजमान झाली आहे. स्टायलिश कॉर्पोरेट लूक आणि चेह-यावर तसाच अॅटीट्यूड या दोन्हींचा मेळ साधत अमृता खुलून दिसतेय.

प्रत्येक सिनेमांमधून अमृताचा सहज सुंदर अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. राझी आणि सत्यमेव जयते सिनेमातील तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. अभिनयासोबतच अमृताच्या डान्ससुध्दा तितकाच भन्नाट असतो. सोनी मराठीवर सुपर डान्सर महाराष्ट्र या डान्स रिएलिटी शोच्या परिक्षकपदाची जबाबदारी ती सध्या सांभाळतेय. अमृताच्या अभिनय व डान्ससोबतच तिच्या लुक्सचीसुध्दा खुप चर्चा होते. ती नेहमीच स्टायलीश राहण्यास पसंती देते.

https://www.instagram.com/p/Bo-sd_BnrmC/?taken-by=amrutakhanvilkar

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive