निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर 100 वर्षांच्या आजींसोबत सूर्यनमस्कार घालतात तेव्हा...

By  
on  

सध्या फिटनेसने सर्वांना वेड लावलं आहे. तरुणाईपासूनच मोठ्यांपर्यंत सर्वचजण आपण फिट राहावं म्हणून जीम, योगा क्लासेस, झुम्बा डान्स अशा नानविविध फॅड्समध्ये वाहून जात आहेत, पण आपल्या वाडवडिलांची शिकवण मात्र कोणच लक्षात घेताना दिसत नाही. घरच्या घरी सूर्यनमस्कार घालूनसुध्दा तंदुरस्त राहता येतं आणि ते ही चक्क 100 वर्ष आणि त्या ही पुढे हे फक्त सांगूनच नाही तर पाहून तुम्ही विश्वास ठेवू शकता. 

'मराठी तारका' फेम प्रसिध्द निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर नुकतेच एका 100 वर्षांच्या आजींना भेटले आणि नुसते भेटलेच नाही तर त्यांच्या सोबत त्यांनी चक्क सूर्यनमस्कार पण घातले. कोकणात राहणा-या लक्ष्मीबाई दामले, वय वर्ष, 100 ह्या बालपणापासून म्हणजेच वयाच्या 7 व्या वर्षापासून सूर्यनमस्कार नित्यनेमाने घालतात आणि याही वयातला त्यांचा उत्साह हा थक्क करणारा आहे. त्यांच्या ह्या निष्ठेला सलाम असं महेश टिळेकर म्हणाले. इतकंच नाही तर लक्ष्मीबाईंच्या आदर्श हा आजच्या आणि भावी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. 

पाहा व्हिडीओ

 

 

 

लक्ष्मीबाईंचा उत्साह खरंच वाखाणण्याजोगा आहे. 

Recommended

Loading...
Share