मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस फेमिनाच्या कव्हर पेजवर

By  
on  

फेमिना मॅगझीनच्या मुखपृष्ठावर झळकणं हा खरंतर अभिनेत्री आणि मॉडेल्स यांचा प्रांत म्हणवला जातो. या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर झळकणं हे प्रतिष्ठेचं मानलं जातं. पण यावेळेस कोणी अभिनेत्री नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना या महिन्याच्या फेमिना मॅगझीनवर झळकण्याचा मान मिळाला आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या या फेमिनाच्या अंकावर अमृता फडणवीस झळकल्या आहेत. यामध्ये त्या काळ्या रंगाच्या मॉडर्न अशा गाऊनमधील दिसत आहेत. केस मोकळे सोडल्याने त्या एखाद्या मॉडेलप्रमाणेच ग्लॅमरस अवतारात दिसून येत आहेत. गायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमृता आपल्याला काही अल्बममध्ये किंवा कार्यक्रमात गाताना दिसतात. आता फेमिनाच्या  मुखपृष्ठावर झळकल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

https://twitter.com/fadnavis_amruta/status/1048585799011192834

आपल्या या फेमिना मॅगझीनवर झळकण्याबाबत स्वत: अमृता यांनीही ट्विट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणतात, आपल्यातील सगळेच जण भारी काही करतील असे नाही, पण आपण लहान लहान गोष्टीही प्रेमाचा वर्षाव करुन करु शकतो.

व्यवसायने बॅंकर असलेल्या अमृता फडणवीस यांना समाजसेवेचीही बरीच रुची आहे. भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांचा जीवनपट उलगडणा-या सिनेमासाठीसुध्दा अमृता यांनी पार्श्वगायन केले आहे. रिव्हर अँथममध्ये मुख्यमंत्र्यां सोबत त्यांनी केलेला अभिनय व गीत ही विशेष गाजले होते. महाायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतसुध्दा त्यांनी एक व्हिडीओ अल्बम केला होता. त्याचीसुध्दा बरीच चर्चा रंगली होताी.

 

Recommended

Loading...
Share