पाहा Video : मल्टीस्टारर 'धुरळा'चा 'नाद करा'च

By  
on  

'धुरळा' हा राजकारणासाठी आपली रक्ताची नातीसुध्दा कशी पणाला लागतात या भोवती फिरणारा सिनेमा. या सिनेमातलं नाद करा ...पण आमचा कुठं हे धम्माल गाणं नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं पाहून तुम्ही थिरकला नाहीत तरच नवल. आनंद आणि आदर्श शिंदे या बापलेकाच्या जोडीने या गाण्याला जबरदस्त स्वरसाज चढवला आहे. 

राजकारणाभोवती गुरफटलेल्या कुटुंबाची गोष्ट धुरळामध्ये दिसून येते. एका पाठोपाठ एक घरातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर काय घडतं याचा अंदाज ट्रेलरमध्ये येतो. 

'धुरळा' या सिनेमात सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, प्रसाद ओक, अलका कुबल, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी,  आदी मराठी इंडस्ट्रीतले लोकप्रिय कलाकार एकत्र झळकणार आहेत. प्रत्येकाचे लुक्स एकदम हटके आणि रावडी असलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ‘हव्वा कुणाची रं, हव्वा आपलीच रं’…. ही टॅगलाईन सिनेमाला शोभून दिसते.  'धुरळा' हा मल्टिस्टारर सिनेमा 3 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा गाणं  

 

 

 

 

Recommended

Loading...
Share