By  
on  

या अभिनेत्रीला ओळखलंत का..लवकरच झळकतेय हॉलिवूडपटात

मराठी सिनेसृष्टीत  गोंडस चेहरा आणि निरागस अदा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री आहे. तिने आपला बालपणीचा हा फोटो शेअर करत चाहत्यांना एकदम खुश करुन टाकलं आहे. हा फोटो खजिन्यातून मिळाल्याप्रमाणे तिला आनंद झाला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. तुम्ही तिला ओळखंलत ना? 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Pro at giving the " HE KAY CHALLAY " look since std 3rd

A post shared by Shruti Marathe (@shrumarathe) on

अहो... ही गोंडस लहान परी म्हणजेच अभिनेत्री श्रृती मराठे आहे.  ‘राधा बावरी’ या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. तर  ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेत परीराणी आणि बानूच्या दुहेरी व्यक्तिरेखा साकारणा-या श्रृतीचं सर्वत्र कौतुक झालं. श्रृती 'बार्ड ऑफ ब्लड' मध्ये झळकली. इम्रान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या या वेबसिरीजमध्ये श्रृतीची व्यक्तिरेखा होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Rise n shine Pic by - @shreyas_34

A post shared by Shruti Marathe (@shrumarathe) on

श्रृती लवकरच तिच्या हॉलिवूडपटासाठी सज्ज होत आहे. लेखक आणि दिग्दर्शक डॉ. रवि गोडसे यांच्या आगामी Remember Amnesia या हॉलिवूडपटाच्या माध्यमातून अभिनेत्री श्रृती मराठे रसिकांसमोर येईल. श्रृतीसह अनेक दिग्गज मराठी कलाकार यात झळकणार आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shruti Marathe (@shrumarathe) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive