मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि प्रसिध्द निर्माते दिपक राणे अगदी शेम टू शेम दिसतायत नेमकं काय आहे, यामचं रहस्य. सर्वांनाच हा प्रश्न पडला.
‘झी टॉकीज’ वाहिनीतर्फे पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात २ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या सहा संघांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. सहा संघांच्या मालकांमध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचाही समावेश असल्याने कुस्तीच्या खेळात आता आणखी नवा साज चढेल. या महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या या सोहळ्यात निर्माते दिपक राणेसुध्दा उपस्थित होते आणि दोघंही एकमेकांसमोर आले तेव्हा दोघांचाही ब्लॅक अॅण्ड व्हाईट बिअर्ड लूक अगदी एकसारखाच होता. यामुळेच हे दोघं सोहळ्यातील अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.
सैराट,फॅंड्री आणि आता नाळ सिनेमा घेऊन नागराज मंजुळे प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. तर निर्माते दिपक राणे यांनी दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तू हि रे, गुरू ह्या सिनेमांची तर दिल दोस्ती दुनियादारी, दूहेरी, अंजली, फ्रेशर्स आणि दुनियादारी फिल्मीस्टाइल ह्या मालिकांचीसुध्दा निर्मिती केलीय.
जसा या दोघांचा एका लूकमुळे मेळ साधला जातोय तसा कुठल्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी हे दोघं एकत्र येत असतील तर काय सोने पे सुहागाच!