By  
on  

पाहा उर्मिला मांतोडकरच्या 'माधुरी'चा टिझर;खट्याळ अंदाजात दिसली सोनाली कुलकर्णी

उर्मिला मातोंडकर आणि तिचे पती मोहसीन अख्तर यांच्या मुंबापुरी प्रोडक्शनची निर्मिती असलेला पहिला-वहिला मराठी सिनेमा असेलेल्या माधुरीचा फर्स्ट टिझर नुकताच उलगडला आहे. या सिनेमात गुणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या सिनेमात ती टिनएजर मुलांची आई असल्याचं पाहायला मिळतंय. पण तरीही तिचा खट्याळ अंदाज एक सरप्राईजचं वाटतंय. तसंच शरद केळकर आणि सिनेमाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांची कन्या संहिता जोशी यांच्या या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

एका सुंदर नात्यावर गुंफलेला दर्जेदार, खुसखुशीत आणि सुंदर असा ‘माधुरी’ सिनेमा प्रेक्षकांसाठी एक निखळ आणि अर्थपूर्ण मनोरंजनाची मेजनी असेल. एकूण या सिनेमाची कथा नेमकी कशावर आधारित आहे, याबाबत हा टिझर पाहून प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

https://twitter.com/52fridaycinemas/status/1054636070854377472

मराठी सिनेमाविषयी असलेली आवड जोपासत मोहसिन अख्तर निर्मित ‘माधुरी’ या सिनेमाची सुंदर कथा आणि कलाकारांचा सुंदर अभिनय येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive