'तानाजी'साठी चला हवा येऊ द्याच्या मंचावर अजय-काजोलची धम्माल

By  
on  

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर खळखळून हसायला लावणारा सर्वांचा लाडका कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ दया'. या कार्यक्रमाच्या विनोदवीरांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात बॉलिवूडकरांना येण्यास भाग पाडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंह शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित 'तानाजी द अनसंग वॉरिअर' हा सिनेमा आता आपली मायबोली मराठी भाषेत सिनेरसिकांच्या दिमतीला आला आहे.  अजय देवगण स्टारर आणि ओम राऊत दिग्दर्शित या  बहुचर्चित सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमाच्या प्रोमोशननिमित्त अजय- काजोल या बॉलिवूडच्या पॉवर कपल जोडीने थुकरटवाडीत खास हजेरी लावली. 

अजय-काजोलसह या सिनेमात अभिनेता देवदत्त नागेसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतोय. तो सुध्दा या दोघांसोबत 'चला हवा येऊ दया'च्या मंचावर उपस्थित होता. मग काय यांना पाहून श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भरत गणेशपुरे आणि निलेश साबळे या सर्वच विनोदविरांना उधाण आले व त्यांनी एकच कल्ला केला.'प्यार तो होना ही था' या अजय काजोलच्या सिनेमाचं स्किट त्यांच्याचसमोर अफलातून अंदाजात सादर केलं.  

अभिनेता शरद केळकर सिनेमात छत्रपती शिवरायांची व्यक्तिरेखा साकारतोय तर अजयची पत्नी आणि अभिनेत्री काजोल तानाजींची पत्नी सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारतेय. काजल प्रथमच मराठमोळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सैफ अली खान सुद्धा खलनायकाच्या म्हणजे किल्लेदार उदयभान राठोडच्या भूमिकेत आहे. 

'तानाजी द अनसंग वॉरिअर'  हा सिनेमा 10 जानेवारी 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

Loading...
Share