‘फँड्री’ आणि ‘सैराट’ असाच एक चाकोरीबाह्य विषयासह नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेला नाळ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा ‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यंक्कटी सांभआळत आहेत. प्रथमच नागराज त्याच्या सिनेमात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय. एका लहान मुलाच्या भावविश्वाचा वेध घेणा-या या ‘नाळ’चा ट्रेलर नुकताच उलगडला आहे.
श्रीनिवास पोकळे या बालकलाकाराने सिनेमात आठ-नऊ वर्षांच्या दंगेखोर मुलाची भूमिका अप्रमिम साकारल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्याचं आणि त्याच्या आईच्या नात्याचे विविध पैलू ‘नाळ सिनेमात मांडण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होतोय. नागराज मंजुळे यांनी चैतन्यच्या वडिलांची भूमिका साकारलीय.
https://twitter.com/TheZeeStudios/status/1055129137533222912
काही दिवसांपूर्वीच नागराज मंजुळे यांनीच खुद्द या सिनेमाबाबत फेसबुक पोस्टव्दारे माहिती दिली होती. “माझा पहिला चित्रपट जो मी निर्माण केला नि प्रस्तुत करत आहे. माझा मित्र नि सैराटचा कॅमेरामन सुधाकर रेड्डीने हा दिग्दर्शित केला आहे. माझ्याच मनातली गोष्ट सुधाकर सांगतोय. नितीन वैद्य,विराज लोंढे,निखिल वराडकर, प्रशांत पेठे हे या निर्माणातील सोबती आहेतच. मंगेश कुलकर्णी आणि झी स्टुडिओज टीममुळेच हे शक्य होत आहे.झी स्टुडिओज, मृदगंध फिल्म्स नि आटपाट चिअर्स !!!”, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
येत्या 16 नोव्हेंबर रोजी नागराज मंजुळे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला ‘नाळ’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.