अभिनेता- दिग्दर्शक आलोक राजवाडे यांचा अश्लील उदयोग मित्र मंडळचं नवीन पोस्टर नुकतंच उलगडलं आहे. अश्लील उद्योग मंडळमध्ये आलोकची पत्नी आणि अभिनेत्री पर्ण पेठे व अभिेनता अभय महाजन प्रमुख भूमिकेत आहेत. मामी फिल्म फेस्टिवलला नुकतीच सुरुवात झाली असून यात 30 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला हा सिनेमाचं स्क्रिनींग होणार आहे. याबाबतची माहिती खुद्द पर्णनेच सोशल मीडियावर दिली आहे.
‘अश्लील उद्योग मंडळ’, असं हटके आणि उत्सुकता निर्माण करणारं शिर्षक असलेल्या या सिनेमात अभिनेता अभय महाजन प्रमुख भूमिकेत आहे. तसंच सई ताम्हणकर, ईशा केसकर या अभिनेत्रीसुध्दा सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
आलोक राजवाडे बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांसाठी पुन्हा काहीतरी नवीन घेऊन येत असल्याचं दिसून येत आहे. या सिनेमाची कथा धर्माकिर्ती सुमंत यांनी लिहीली आहे.या कथेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वचण या सिनेमाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात आहेत.
https://www.instagram.com/p/BpWsQCjh8wl/?taken-by=parnapeace
दरम्यान,आलोकने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘विहीर’, ‘राजवाडे अॅण्ड सन्स’, ‘कासव’ अशा अनेक सिनेमांमधून आलोकच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळालीय. अनेक सिनेमे आणि नाटकांमधून आपली छाप पाडणारा युवा आणि हरहुन्नरी अभिनेता आलोक राजवाडेच्या अश्लील उद्योग मंडळ या आगामी सिनेमाची प्रचंड आतुरता लागून राहिली आहे.