शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आपल्या भारदस्त संगीत कारकिर्दीनंतर आता अभिनयात पदार्पण करत आहे. या संगीतमय अशा सिनेमाचे नाव 'अमलताश' आहे. राहुल देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेाल हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी बालगंधर्व आणि पुष्पक विमान या मराठी सिनेमांमध्ये राहुल देशपांडे पाहुणे कलाकार म्हणून झळकले होते.शास्त्रीय गायनाच्या मैफिली, संगीत नाटक यामधून प्रेक्षकांसमोर येणारे राहुल देशपांडे यांचा अभिनय पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहे.
अमलताश या सिनेमाचा टिझर नुकताच उलगडला.महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या मामि' फिल्म फेस्टिव्हलसाठीसुध्दा या सिनेमाची निवड करण्यात आली आहे. एका संगीत कलाकाराच्या आयुष्याभोवती या सिनेमाचे कथानक गुंफले आहे. राहुलसोबतच या सिनेमात पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दिप्ती माटे आणि त्रिशा कुंटे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
https://twitter.com/deshpanderahul/status/1055109866715406336
खुद्द राहुल देशपांडे यांनीच ट्विटरवरुन आपल्या पहिल्या-वहिल्या सिनेमाची निवड यंदाच्या मामि फिल्म फेस्टिव्हसलाठी करण्यात आल्याची आनंदवार्ता दिली. अमलताश सिनेमाची कथा सुहास देसले यांची असून, त्यांनीच दिग्दर्शनदेखील केले आहे. भूषण माटे यांनी सिनेमाला संगीत दिले आहे.
https://www.facebook.com/amaltashfilm/videos/491106618075758/