ज्येष्ठ संगीतकार,गीतकार यशवंत देव यांचे रात्री दीड वाजता वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मराठी संगीत विश्वावर त्यांनी संगीतकार, गीतकार महणून गेली अनेक दशकं अधिराज्य गाजवलं. आज सांयकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘अखेरचे येतील माझ्या…’ ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’ अशा हजारो गीतांना त्यांनी संगीतबध्द करत ही गाणी अजरामर केली.
'सारेगमप' या रिएलिटी कार्यक्रमाच्या मागील काही वर्षातील पर्वात पाहुणे परिक्षक म्हणूनही त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती आणि भावी पिढीच्या संगीतकार-गायकांना अमूल्य असं मार्गदर्शन केलं होतं.