मला आई व्हायचंय या मराठीतील पुरस्कार विजेत्या सिनेमाचा अधिककृत हिंदी रिमेक 'मिमी' लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये मराठीत उर्मिला कानेटकरने सांकारलेली भूमिका क्रिती सेनॉन साकारतेय. तर या हिंदी सिनेमात आपली सई ताम्हणकरसुध्दा महत्त्वपू्र्ण भूमिकेत आहे.'लुपाछुपी' फेम आपला मराठमोळा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय.याच्या दुस-या शेड्यूलला नुकतीच सुरुवात झालीय सईने क्रिती आणि टीमसोबतचा फोटो आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन नुकताच शेअर केला.
सरोगेट आई आणि मुलावर आधारित भारतातला पहिला सिनेमा अशी ओळख असलेला मला 'मला आई व्हायचंय'ने अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. समृध्दी पोरे लिखित दिग्दर्शित या सिनेमाचा 'मिमी' हा हिंदी रिमेक.
काही दिवसांपूर्वीच सईने ती या सिनेमात क्रिती सोबत स्क्रीन शेअर करते आहे. याची माहिती दिली होती. दोघींचासुध्दा एक धम्माल फोटो सईने पोस्ट करुन चाहत्यांना आश्चर्यचकित केलं होतं. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला.
अभिनेत्री क्रिती सेनॉन 'मिमी' ह्या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकतेय तर पंकज त्रिपाठीसुध्दा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मडॉक फिल्म्सने या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून सर्वांनाच हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागून राहिली.