By  
on  

पाहा 'एक सांगायचंय...Unsaid Harmony' सिनेमातलं हे हद्यस्पर्शी गाणं

के. के मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'एक सांगायचंय...Unsaid Harmony' या आगामी  सिनेमातलं एक हदयस्पर्शी गाणं नुकतंच उलगडलं आहे. चौकोनी कुटुंबातील पालक आणि मुलांच्या इच्छा-आकांक्षाभोवती फिरणारं 'हळवा-कोपरा' हे गाणं अगदी मनाला भिडतं.अवधूत गुप्ते, बेला शेंडे आणि राशी हळमळकर यांच्या सुमधूर आवाजात हे गीत स्वरबध्द करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशीने या गीताचे बोल लिहले आहेत.

एका कुटुंबाची गोष्ट सिनेमात मांडणार असल्याचे समजते. आई-बाबा आणि मुलं या दोन पिढीतलं अंतर आणि त्यांच्यातील हरवलेला संवाद या विषयावर सिनेमाद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

नितीन कुलकर्णी यांचे कला दिग्दर्शन आणि चैत्राली लोकेश गुप्ते यांनी  वेशभूषाकार म्हणून काम पाहिले आहे तर ऑस्कर विजेत्या रेसूल पुकुट्टीनं ध्वनी आरेखनाची  तर पुष्पांक गावडे यांनी सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे.

https://youtu.be/lJkCe7qS1D0

येत्या १६ नोव्हेंबरला देवी सातेरी प्रॉडक्शनची निर्मिती असलेला  ‘एक सांगायचंय…. UNSAID HARMONY’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive