आजकाल हिंदी असो किंवा मराठी प्रत्येक सिनेमाची बॉक्स ऑपिसवर जोरदार स्पर्धा सुरु असते. कधी कधी तर फ्रेक्षकांनासुध्दा प्रश्न पडतो कि कोणता सिनेमा पाहावा. पण नुकताच हा असाच एका सिनेमाबाबतचा पेच सोडवण्यासाठी अभिनेता रितेश देशमुखने पुढकार घेत स्तुत्य पाऊल उचललं आहे.
महत्त्वाचं म्हणजे त्याच्या या निर्णयामुळे किंग खान शाहरुखने त्याचे विशेष आभार मानले आहेत. शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित झिरो हा सिनेमा आणि रितेश देशमुखचा माऊली हा सिनेमा एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र रितेशने मोठेपणा दाखवत आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/iamsrk/status/1059399371144470528
रितेशच्या या निर्णयामुळे किंग खान त्याच्यावर भलताच खुश झाला आहे. त्याबद्दल त्याने एका ट्विटद्वारे रितेशचे आभार मानत त्याच्या मनापासून या लय भारी वागणुकीचे कौतुक केले आहे.
https://twitter.com/Riteishd/status/1059505277534375936