Photo: कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा हा नवा टॅट्टू पाहिलात का?

By  
on  

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय शोमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. सहज-सुंदर विनोद साकारुन सर्वांना निखळ मनोरंजनाची पर्वणी देते. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे श्रेया नेहमीच आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन चाहत्यांच्या संपर्कात असते आणि विविध अपडेट्स त्यांच्यापर्यंत पोहचवत असते. आपल्या कार्यक्रमात श्रेया विविधांगी भूमिका साकरताना पाहायला मिळत असली तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ती स्टायलिश राहण्याला पसंती देते. 

श्रेयाने नुकताच एक नवा टॅट्टू केला आहे. सध्या तिच्या या नव्या टॅटूची जोरदार चर्चा रंगली आहे. #newink म्हणतं तिने हा फोटो शेअर केला आहे. यासोबत श्रेयाने 'मैं......... खुद को महसूस कर लिया करो,कुछ रौनकें; खुद से भी हुआ करती है' अशी शायरी शेअर केली आहे. श्रेया बुगडेचा हा पहिला टॅटू नाही. यापूर्वी सुध्दा तिने पाटीवर दुर्गा मॉंचा टॅट्टू केला आहे.तर  हातावार भाचा 'आराध्य' च्या नावाचा टॅटू काढून घेतलाय. 

श्रेयाच्या हातावर तिसऱ्या टॅटू म्हणजे 'इक्विलिबीरियम' काढला आहे. आणि आता श्रेयाने चौथा टॅटू काढून घेतला तो म्हणजे 'मैं' हा हिंदीतील अक्षर आहे. त्यामुळे श्रेया आणि टॅट्टू यांचं जुनंच नातं असंच म्हणावं लागेल, 

Recommended

Loading...
Share