झी मराठी या वाहिनीवरुन प्रसारित होणारा ‘चला हवा येऊ द्या’ या तुफान लोकप्रिय कार्यक्रमाला नुकतंच एक गालबोट लागलं आणि यासाठी या वाहिनीला व कार्यक्रमातील कलाकारांना माफी मागावी लागली.
मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या भागांमध्ये आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे झी मराठी वाहिनीला याप्रकरणी माफी मागावी लागली. या वाहिनीच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन आगरी समाजाची माफी मागत, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना लेखी पत्र लिहून आगरी समाजाकडून ही तक्रार करण्यात आली.
https://www.facebook.com/zeemarathiofficial/photos/a.10152260152474307/10157856869724307/?type=3&theater
भाऊ कदम यांनी आगरी व्यक्तिरेखा 'चला हवा येऊ द्या'च्या या भागांमध्ये साकारली होती. आगरी आणि कोळी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यामुळे विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनीसुध्दा रविवारी प्रसिध्दी माध्यमांशी याबाबत बोलताना जाहीर माफी मागितली.