'मिमी'च्या शूटींग दरम्यान सई ताम्हणकरच्या पायाला झाली दुखापत

By  
on  

मराठीतील ग्लॅमरस आणि आघाडीची अभिनेत्री म्हटलं तर सई ताम्हणकर हेच नाव सर्वांना आठवतं. सईच्या चाहत्यांसाठी एक थोडीशी काळजी करण्यासारखी बातमी आहे, ते म्हणजे तिच्या पायाला दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर आहे. सई सध्या वॉकरच्या साहाय्याने चालतेय.  सध्या आपली मराठमोळी सई बॉलिवूडमध्येसुध्दा तिच्या अभिनयाची चुणूक दाखवतेय. तरबेज नूरानी यांच्या 'लव्ह सोनिया' सिनेमात झळकल्यानंतर लवकरच ती क्रिती सेनॉन स्टारर 'मिमी'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Standing tall with @suchika__ @fatmupromakeup #shootlife #mirrorselfie #bts #saitamhankar

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

 

एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'मिमी'च्या शूटींग दरम्यान राजस्थान येथील मांडवा या लोकेशनवरुन  पॅक अप झाल्यानंतर हॉटेलवर परतताना तिचा पाय जोरात मुरगळला. या वृत्तपत्राशी बोलताना सई सांगते, "फ्रॅक्चर झाल्याने मला खुपच या दुखापतीची काळजी वाटत होती. पण माझ्यामुळे शूटींग शेड्यूल बिघडू नये असं वाटत होतं. म्हणूनच मी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबतच्या चर्चाविनीमय करुन  विविध अॅंगलने शूट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मला आई व्हायचंय' या मराठीतील पुरस्कार विजेत्या सिनेमाचा अधिककृत हिंदी रिमेक 'मिमी' लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये मराठीत उर्मिला कानेटकरने सांकारलेली भूमिका क्रिती सेनॉन साकारतेय. तर या हिंदी सिनेमात आपली सई ताम्हणकरसुध्दा महत्त्वपू्र्ण भूमिकेत आहे.'लुपाछुपी' फेम आपला मराठमोळा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय.

 

 

सईच्या मराठी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर 'धुरळा' या मल्टिस्टारर सिनेमाच्या यशानंतर सईचा 'अश्लिल उद्योग मंडळ' हा सिनेमा येत्या 6 मार्चला रसिकांच्या भेटीला येत आहे. यात सई सविता भाभी ही लक्षवेधी भूमिका साकारतेय, परंतु सविता भाभी नावाच्या कॉपीराईटमुळे हा सिनेमा वादाच्या भोव-यात अडकला होता. परंतु 'सविता भाभी'  य़ा शब्दाला म्यूट करुन सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Peek-A-Boooooo !!! #shootlife #saitamhankar #kritisanon #mimi @aasifahmedofficial

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

 

 

Recommended

Loading...
Share