By  
on  

‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’

मुंबईची गौरी आणि पुण्याचा गौतम यांची लव्हस्टोरी, लग्न यानंतर त्यांची गोष्ट आता पुढे गेलीय. लवकरच आपल्या सर्वांचा आवडता सिनेमा ‘मुंबई-पुणे-मुंबई’चा 3 भाग भेटीला येतोय. या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार याची खुप उत्सुकता आहेच, पण या सिनेमातलं एक गाणं नुकतंच उलगडलं आणि या भागाची कथा कशावर आधारित आहे, हे गोड गुपित समोर आलं.

‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे सुरेख गाण उलगडलं आणि यात गौरी-गौतम आई-बाबा होणार आहेत हे समजतंय. तसंच मुंबई व पुणे हे संपूर्ण कुटूंब एकत्र होऊन आनंदात न्हाऊन निघत असल्याचं पाहायला मिळतंय. गौरीच्या डोहाळे पुरवणाचा प्रसंग खुप गोड दिसतोय.

स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. सिनेमाचे निर्माते संजय छाब्रिया, सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई-३’ च्या प्रदर्शनाची घोषणा केली आणि सिनेरसिकांच्या आनंदाला उधाण आलं.

‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांनी लिहिले आहेत.

https://youtu.be/vUUDfkBT4zs

येत्या 7 डिसेंबर 2018 रोजी बहुप्रतिक्षित ‘मुंबई पुणे मुंबई-3’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive