By  
on  

‘युवा डान्सिंग क्विन’च्या टीमने फुलांची उधळण करत साजरी केली इको फ्रेंडली होळी 

युवा डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्ये एका पेक्षा एक डान्स करणाऱ्या नृत्यांगना स्पर्धक म्हणून आहेत. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक ओमकार शिंदे हा या शोमध्ये या सगळ्या डान्सिंग क्विनचे डान्स दिग्दर्शित करतो. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मयुर वैद्य हे या शोचे परिक्षक आहेत. 
नुकतच या डान्सिंग क्विनच्या टीमने मिळून धुळवड साजरी केली.

मयुर वैद्यच्या डान्स स्टुडिओमध्ये या निमित्ताने ही संपूर्ण टीम एकत्र जमली होती. मात्र यावेळी या सेलिब्रेशनमध्ये रंग आणि पाण्याचा वापर न करता या मंडळींनी फुलांच्या पाखळ्यांचा वापर करत फुलांची उधळण करत हा सण साजरा केला. 


यावेळी एकत्र डान्स करून, फुलांची उधळण करत या नृत्यांगनांनी होळीचं सेलिब्रेशन केलं.

यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही या स्पर्धकांसोबत थिरकताना दिसली. यावेळी युवा डान्सिंग क्विन या कार्यक्रमाच्या काही स्पर्धकही हजर होते. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive