सध्या तरुणाई म्हणजेच जनरेशन नेक्स्ट आपली पारंपारिकता जपताना पाहायला मिळते.त्यात मराठी सेलिब्रिटीसुध्दा आपला मराठमोळा पारंपारिक साज जपताना नेहमीच पाहायला मिळतात. त्या हटके लुकमधील विविध फोटो त्यांच्या सोशल मिडीयामुळे चाहत्यांमुळे पोहचतात. व त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतो. ओल्ड इज गोल्ड या म्हणीप्रमाणे आपली परंपरा उत्साहाने आणि अभिमानाने मिरवत अभिनेत्री नेहमीच नवे स्टाईल स्टेटमेंट सेट करतात.
इरकल ही सोलापूर ठिकाणची स्पेशालिटी आहे. इरकल ही अशी साडी आहे जी नेसायला सोपी आणि सावरायलाही सोपी आहे.
खरंतर पारंपरिक साड्यांची फॅशन कधीच जुनी होत नाही, ज्यामुळे त्या तुम्ही वर्षानूवर्ष नेसू शकता.
इरकली साडीमुळे तुमचा लुकमध्ये चार चॉंद लागतात. गडद रंगाची एखादी इरकल साडी आणि त्यावर पारंपरिक ठुशी अथवा इतर साजेसा दागिना तुम्हाला एक खास लुक मिळवून देईल आणि तुम्हीसुध्दा यांच्याप्रमाणेच चारचौघींमध्ये उठून दिसाल.
इरकली ही साडी सहावारी आणि नऊवारी अशा दोन्ही प्रकारात मिळते
एखाद्या गडद रंगाच्या इरकली साडीवर तुम्ही स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करुन एक हटके आणि लक्षवेधून घेणारा लुक ट्राय करु शकता.
तुम्हालासुध्दा तुमच्या आईच्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये एखादी इरकली साडी हमखास मिळून जाईल आणि तुम्ही ती आत्ताही घेऊन तुमचं फॅशन गोल साध्य करु शकता.