By  
on  

मी जेव्हा वॉशरुमला जातो तेव्हा माझा फोन नेहमी वाजतो – स्वप्निल जोशी 

सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ या कादंबरीवर आधारित वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं असून स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडीत या सिरीजमध्ये मुख्य भूमकिते आहेत. या वेबसिरीजच्या निमित्ताने सतिश राजवाडे, स्वप्निल आणि तेजस्विनीचं वेब दुनियेत पदार्पण होत आहे. 


नुकतच या वेबसिरीजच्या दोन एपिसोडचं खास स्क्रिनिंग करण्यात आलं. यावेळी पिपींगमून मराठीशी बोलत असताना स्वप्निलने त्याच्याविषयीची एक मजेशीर गोष्ट शेयर केली. ट्रेलरमध्ये या वेबसिरीजमधील स्वप्निल साकारत असलेलं कुमार महाजन हे पात्र जेव्हा रेल्वेचं तिकीट घ्यायला जातं तेव्हा तिकीट खिडकी बंद होते आणि लंच टाईम होतो. यावर कुमार महाजन हे पात्र त्याच्या नशीबाला दोष देतो. मात्र स्वप्निलच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट घडते का ? हे विचारलं असता त्याने एक गोष्ट यावेळी शेयर केली. स्वप्निल म्हणतो की, “ रेल्वेचं तिकीट मिळालं नाही असं माझ्या बाबतीत कधीच झालं नाही. पण माझा एक विचित्र अनुभव मी शेयर करतो. मी जेव्हा जेव्हा स्वच्छतागृहात (वॉशरूमला) जातो तेव्हा तेव्हा माझा फोन वाजतो. मी कधीही वॉशरुमला गेलो की माझा हमखास फोन वाजतो.” स्वप्निलने त्याच्या आयुष्यात नेहमी घडणारी ही विचित्र गोष्ट या निमित्ताने शेयर केली. आणि या नेहमी होणाऱ्या गोष्टीचं त्यालाही नवल वाटतं. 


या वेबसिरीजमध्ये कुमार महाजन हे पात्र सुदर्शन चक्रपाणी या व्यक्तिच्या शोधात आहे. ही व्यक्ति त्याला सापडते का ? काय आहे त्याच्या भुतकाळ आणि भविष्यकाळाचं कनेक्शन हे या वेबसिरीजमध्ये रंजक पद्धतिने मांडलय. या वेबसिरीजचे नऊ एपिसोड प्रदर्शित झाले असून याचे दुसरं सिझनही भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive