या कार्तिकी एकादशीला पुन्हा एकदा घुमणार ‘माऊली’चा गजर. अजय-अतुल यांचं संगीत दिग्दर्शन आणि सुरेल स्वरसाज लाभलेलं माझी पंढरीची माय हे बहुप्रतिक्षीत गाणं आज 19 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालं आहे. अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या ट्विटर हॅंडलवरुन हे गाणं शेअर केलं आहे. यात अभिनेता रितेश देशमुखचा ‘माऊली’ रुप पाहायला मिळतंय. त्याच्यासोबतच नायिका सयामी खेर आणि खुद्द संगीतकार जी अजय-अतुलसुध्दा पाहायला मिळतायत.
‘लय भारी’ सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर या सिनेमातील माऊली या व्यक्तिरेखेवर हा आगामी सिनेमा आहे. पण हा या सिनेमाचा सिक्वल नाहीय. फक्त व्यक्तिरेखेवर आधारित असलेला हा सिनेमा एका वेगळ्या कथानकावर बेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनोमाच्या टिझरमधून रितेश हा पंढरपूरातल्या एका डॅशिग पोलिसाच्या अवतारात पाहायला मिळला. त्यामुळेच गुंडाराज किंवा भ्रष्टाचाराशी दोन हात करणा-या एका प्रामाणिक पोलिसाची कथा सिनेमात पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
https://twitter.com/Riteishd/status/1064383320937586688
मुंबई फिल्म कंपनी ही हिंदुस्तान टॉकीजच्या सहयोगाने या सिनेमाची प्रस्तुती करत असून रितेशची पत्नी जेनेलिया देशमुख या सिनेमाची निर्माती आहे. आदित्य सरपोतदार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत असून सिनेमात रितेशबरोबर अभिनेत्री सयामी खेर झळकणार आहे.
https://youtu.be/Y8QyyACKa70
अजय-अतुल या सुपरहिट जोडीच्या संगीताने सजलेला रितेश देशमुखचा ‘माऊली’ येत्या 14 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.