वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे या दिग्गज अभिनेत्री प्रथमच येणार एकत्र

By  
on  

मराठी सिनेसृष्टीत 80-90चं दशक गाजवणा-या सुप्रसिध्द अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर या टॉपच्या नायकांना नायिका म्हणून उत्तम साथ देत सिनेमे सुपरहिट करणा-या या दिग्गज अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी लवकरच अनुभवायला मिळणार आहे.

‘पियानो फॉर सेल’ या नाटकाद्वारे वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे या अभिनेत्री एकत्र रसिकांच्या भेटीला येत आहेत. प्रस्तुतकर्ते चैतन्य गिरिश अकोलकर आणि डिजीटल डिटॉक्स या संस्थेने या नाटकाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

लेखिका मेहेर पेस्तोनजी लिखित “पियानो फॉर सेल” या मूळ इंग्रजी नाटकाचे नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन हे आशिष कुलकर्णी यांचे आहे. अत्यंत आगळ्या वेगळ्या विषयावरच्या या नाटकाचे प्रयोग येत्या १ डिसेंबर २०१८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच परदेशातही करण्यात येणार आहे.

Recommended

Loading...
Share