जगभर करोना विषाणूने थैमान घातलंय आणि आपल्या महाराष्ट्रातसुध्दा तो हातपाय पसरतोय. त्याच्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. अनेक जण अनेक नाना त-हेचे उपाय सांगतायत. कोणी म्हणतंय, ह्याला हात लावू नका त्याला हात लावू नका तर कोणी म्हणंतय हे खाऊ नका ते खाऊ नका असे अनेक तर्क काढले जात आहेत. पण चिकन बाबतीतसुध्दा अनेक गैरसमज अजूनही पसरले आहेत.
भीतीपोटी आणि अफवांमुळे मांसाहारी खवय्यांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे अनेक शेतकरी,ज्यांचा शेतीला जोडधंदा म्हणून कुकुट पालन आहे,अश्या शेतकऱ्यांचे आणि पोल्ट्री उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत लोकांचा गैरसमज दूर व्हावा आणि चिकन अंडी खाण्यात कुठलाही धोका नाही हे सांगणारं गाणं निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर ह्यांनी तयार केले आहे. प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की ह्यांनी संगीत दिलेले हे गीत महेश टिळेकर यांनीच लिहिले आहे.
'मराठी तारका' फेम प्रसिध्द निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर हे सतत सोशल मिडीयावर सक्रीय असतात. आपल्या नवनवीन प्रोजेक्टसोबतच ते नेहमीच नावीन्यपूर्ण आणि प्रबोधनपर गोष्टी चाहत्यांपर्यंत पोहचवताना पाहायला मिळतात.