करोनाच्या पार्श्वभूमीवर अवघं जग आज थांबलं आहे. सर्व दैनंदिन व्यवहार कोलमडले आहेत. सर्वच स्तरावर याचा फटका बसला आहे. सध्या तरी त्याच्यावर कुठलीच लस उपलब्ध नाही. आवश्यक ती योग्य खबरदारी घेऊन त्याचा होणारा प्रसार आपल्याला थांबवायचा आहे. ही प्रत्येक भारतीयाची आता नैतिक जबाबदारी आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आलेले हे मराठी सिनेमांवरचे भन्नाट मीम्स जनजागृती तर करतीलच आणि वातावरणसुध्दा हलकं-फुलकं करतील.
विनाकारण प्रवास टाळायला हवा. शक्यतो घराबाहेर पडूच नये .
सर्वांनी एकत्र जमणं टाळावं.
घरुनच काम करण्यास प्राधान्य द्यावं
करोनाग्रस्तांसाठी रुग्णायातील डॉक्टरांसमवेत संपूर्ण स्टाफ आज अहोरात्र झटतोय, त्यात सर्व परिचारिकांचा मोठा वाटा आहे . त्या सर्व हिरकणींना मानाचा मुजरा
जे काही करावसं वाटतंय. छंद, स्वयंपाक, वाचन, व्यायाम सर्व घरीच करावं.
.
घरातून बाहेर न पडलेलंच बरं
सध्या परिस्थिती थोडी नाजूक आहे, योग्य काळजी घेणं आपल्या हातात आहे.
आपलं सरकार आपल्यासाठी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.
या काही साद्या सोप्या गोष्टी करुन आपण करोनापासून बचाव करु शकतो.
सर्वच कामं आता फोनवरुनच करा, बाहेर पडू नका.
सर्वांनी एकत्र येऊन या अस्मानी संकटावर मात देऊया, चला लढूया. करोनाला पळवून लावूया.