'अमर फोटो स्टुडिओ' या मराठी नाटकाचा अमेरिकेत आणि कॅनडात दौरे होते. यासाठी या नाटकातील कलाकार अमेय वाघ, सुव्रत जोशी, पर्ण पेठे , पूजा ठोंबरे हे कलाकार भारताबाहेर होते. त्यातच कोरोना व्हारस आजाराचा सुळसुळाट सुरु झाला. तिन प्रयोगानंतर या नाटकाचे प्रयोग हे रद्द करण्यात आले. मात्र नुकताच अभिनेता अमेय वाघ आणि त्याची टीम भारतात परतली आहे. या अनुभवाविषयी सांगणारा एक व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.
या व्हिडीओत अमेत सांगतो की, “आम्ही कॅलिफोर्नियात होतो, तिथे परिस्थिती भयानक होती, सगळचं अवघड होतं. दुकानांमध्ये ब्रेड, दुध संपलं होतं खुप गर्दी होती. मी माझ्या नातेवाईकांकडे होतो ते माझी काळजी घेत होते. काल मुंबईत परतलो आहे. खूप टेन्शन होतं.”
मात्र भारतात परतल्यानंतरचा अनुभव या व्हिडीओत अमेयने शेयर केलाय. अमेय म्हणतो की, “अत्यंत चांगलं चित्र होतं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आम्ही पोहोचलो. एकतर आम्ही भारतीयांनी खचून भरलेल्या फ्लाईटने आलो. एअरपोर्टला उतरल्यानंतर अत्यंत फास्ट ट्रॅक पद्धतिने त्यांनी सगळ्यांची कोरोनाची टेस्ट घेतली. ते टेस्ट घेणारे ऑफिसर जे होते ते मेडिकल विद्यार्थी होते, तरुण डॉक्टर होते. आणि ते स्वत:चा जीव धोक्यात घालून हे सगळं आपल्यासाठी करत होते त्यांना मला सगळ्यात आधी धन्यवाद म्हणायचयं. एअरपोर्टवरील सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद म्हणायचयं. अप्रतिम पद्धतिने आणि उत्तम फास्ट पद्धतिने काम सुरु होतं. पोलिस खात्यातील, आर्मीतील माणसं तिथे होती. या सगळ्यांना मला धन्यवाद म्हणायचं आहे. या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आपल्या महाराष्ट्रात कोरोना होऊ नेय यासाठी उत्तम उपाय केले जात आहे. आणि हो माझ्या हातावर शिक्काही बसलाय.”
असं म्हणत अमेयने भारतात परतल्यानंतरचा विमानतळावरील चांगला अनुभव शेयर केलाय. सध्या अमेय घरातच बसून आहे.