सरकारने सुचना करूनही, पंतप्रधान मोंदीनी आवाहन करूनही कोरोना व्हायरस या गंभीर आजाराला लोकं गांभिर्याने घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. आणि याविषयी खंत व्यक्त केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी. सोशल मिडीयावर व्हिडीओ पोस्ट करुन नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही गोष्ट अजूनही गांभिर्याने घेतली जात नसल्याची खंत मंजुळे यांनी व्यक्त केली आहे. ते सांगतात की, “मागच्या अनेक दिवस आपलं प्रशासन सरकार आपल्याला सांगतेय की घरी बसा, आणि अनावश्यक कामं टाळून तुम्ही जितकं होईल तितकं घरी बसून राहिलात तर आपण या रोगाच्या प्रार्दुभावापासून वाचू शकतो. पण माझ्या स्वत:च्या अनुभवावरून असं लक्षात येतय की माझ्या जवळची माणसं मित्रमंडळी ही गोष्ट गांभिर्याने घेत नाहीत. पण त्यांना यांच गांभिर्य आणि महत्त्व कळतच नाही.”
अशी खंत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली आहे. शिवाय सगळ्यांना या व्हिडीओच्या माध्यमातून एक विनंतीही केली आहे. नागराज म्हणतात की, “माझी सगळ्यांना विनंती आहे की पुढचे काही दिवस घरातच राहायला पाहिजे. आपलं प्रशासन, सरकार जशा सुचना देतेय तसं वागायला पाहिजे. ही गोष्ट खुप महत्त्वाची आहे, गांभिर्याची आहे आणि धोकादायक आहे हे लक्षात ठेवा. आपल्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही. माझी विनंती आहे तुम्हाला की घरीच बसा.”
कित्येक कलाकार अशा पद्धतिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर येऊन जागरूकता निर्माण करण्याचं काम करत आहेत.