By  
on  

पाहा Video : प्रिया – उमेश सांगत आहेत घरी बसून करा असा व्यायाम 

कोरोना व्हायरसचा वाढता  धोका पाहता महाराष्ट्रासह इतर 13 राज्यांमध्ये लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. मात्र तरीही काही लोकं या गोष्टीकडे गांर्भियाने पाहत नसल्याचं लक्षात येत आहे. मात्र तरीही कलाकार मंडळी त्यांच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करत आहेत. एकीकडे सगळं बंद असताना दररोज व्यावाय करणारी मंडळी जीम बंद असल्याने चिंतीत आहे. काही लोकं घराबाहेर पडून मॉर्निंग वॉक घेण्यासाठीही जात आहेत. मात्र या सगळ्यांना घरातच बसून व्यावाय करण्याचं आवाहन करत आहेत अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट

उमेश आणि प्रिया हे दोघही त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देत असतात. त्यासाठी योग्य तो आहार आणि व्यायामाची काळजी ते घेतात. मात्र लॉकडाऊनमुळे दोघही घरीच असल्याने घरातच कशा पद्धतिने व्यायाम करता येईल यासाठीचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. घरातील टेबल, खुर्ची, बॉटल्स या गोष्टींचा वापर करुन प्रिया या व्हिडीओत व्यायाम करताना दिसतेय. अशा परिस्थितीत आपलं आरोग्यही निरोगी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे. आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठ व्यावायासारखा उत्तम पर्याय नाही.  


अशा सकारात्मक व्हिडीओच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरुकता आणि सध्याच्या परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेण्याची गरज सध्या आहे. आणि ही कलाकार मंडळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही जागरुकता निर्माण करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive