फिल्मइंडस्ट्रीत अजून एक ‘स्टारकिड’, रश्मी अनपट आणि अमित खेडेकरला झालं ‘पुत्ररत्न’

By  
on  

कुलस्वामिनी फेम अभिनेत्री रश्मी अनपट आणि अभिनेता अमित खेडेकरच्या घरी पुत्ररत्न झाले आहे. रश्मी गेले काही दिवस फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून तिच्या प्रेगनन्सीचे फोटोज आणि डोहाळेजेवणाचे फोटो शेअर करत होती. त्यानंतर आता रश्मीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही बातमी शेअर केली आहे. रश्मी आणि अमितला 13 ऑक्टोबर 2018ला मुलगा झाला. पण त्यांनी ही बातमी एक महिना लपवून ठेवली होती. जवळ जवळ एक महिना उलटून गेल्यानंतर 24 नोव्हेंबरला सोशल मीडियावरून रश्मीने ही अनाउन्समेंट केलीय

सध्या बॉलीवूडमध्ये आपल्या आईवडिलांपेक्षा तैमुर अली खान, यश जोहर, रूही जोहर जास्त प्रसिध्द झालेत. सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या स्टारकिड्सची फॅनफॉलोविंग वाढताना दिसतेय. ह्यात मराठी सिनेसृष्टीही मागे नाही आहे. आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेची मुलगी ‘जीजा’चे फोटोही सोशल मीडीयावरून वायरल होत आहेत. आणि आता जीजा पाठोपाठ अजून एका स्टारकिडचा मराठी ग्लॅमरवल्डमध्ये जन्म झालाय.

अभिनेत्री रश्मी अनपट आणि अभिनेता अमित खेडेकरचा विवाह डिसेंबर 2013मध्ये झाला. हे दोघंही पहिल्यांदा ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ ह्या नाटकाच्यावेळी भेटले. दोघेही काही वर्षांपूर्वी हे नाटक रंगभूमीवर करत होते. ह्या नाटकात रश्मी येसुबाई तर अमित संभाजीच्या भूमिकेत होता. त्यानंतर रश्मी असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, सुवासिनी, फ्रेशर्स, कुलस्वामिनी अशा मालिकांमधून दिसली. रश्मीने नुकत्याच साकारलेल्या कुलस्वामिनी मालिकेतल्या आरोहीच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

https://www.instagram.com/p/BqjaKZgH5P6/?utm_source=ig_share_sheet&igshid=v5jp5ilopq9b

या मालिकेनंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. पण तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत नेहमीच गप्पा मारत असते. रश्मी ही प्रेक्षकांची लाडकी असल्याने तिला तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर सोशल नेटवर्किंग साईटवर फॉलो करतात.

अमित खेडेकरच्या हृदयांतर सिनेमालाही खूप प्रसिध्दी मिळाली होती. त्यामूळे ह्या सेलिब्रिटी कपलला बरीच फॅनफॉलोविंग आहे.

Recommended

Loading...
Share