सध्या करोनाने जगभरच नुसता धुमाकूळ घातला आहे. यात दगावलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारनेही या विरोधात युध्द पुकारलं असून अनेक कठोर नियम केले आहेत . आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्या नियमांचं काटेकोर पालन करुन करोनाला परतवून लावण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वच सुजाण नागरिकांची आहे.
घरी बसून स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबियांची काळजी घेणं हीच लढाई आपल्या सर्वांना जिंकायची आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसविणारा विनोदवीर अभिनेता कुशल बद्रिकेने एका अनोख्या स्टाईलने करोनाविषयक जनजागृती केली आहे. कुशल व त्याच्या कुटुंबियांनी ह्यासाठी एक खास गाणं तयार केलं आहे. ‘गो करोनिया… गो गो करोनिया’ असे ओ वुमनिया.. च्या धर्तीवरचे याचे बोल असूनहे भन्नाट गाणं चांगलंच व्हायरल होत आहे.
कुशल ह्या गाण्याची पोस्ट करत म्हणतो, “घरीच राहून तुमच्या कुटूंबासोबत वेळ काढा, आणि काळजी घ्या. घरी काहीतरी creative करा आणी मला नक्की TAG करा. माझ्या कुटूंबाकडून थोडं मनोरंजन आणि थोडं प्रबोधन.”
कुशलच्या या गाण्यावर कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरु आहे.
एरव्ही चित्रीकरणा व्यस्त असल्याने कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, ही खंत असते. पण आता वेळ मिळाला आहे तर त्याचा सदुपयोग करुया. कुटुंबियांची काळजी घेऊया असं कुशलंचं हे अनोख्या अंदाजातलं आवाहन सर्वचजण नक्की ऐकतील.
-items: center;">
Go corona. We appreciate our doctors, police and government. Thank u all #janatacurfew