महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. मात्र यावर्षी कोरोना व्हायरसमुळे हा सण घराबाहेर पडून, शॉपिंग करून साजरा करता येणार नाही. तरीही घरात बसून गुढीपाडवा उत्साहात साजर होईल या शंका नाही. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतच पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत तिने गुढीपाडव्याला ती काय करणार याविषयी सांगीतलं.
सोनाली कुलकर्णी सध्या आपल्या कुटुंबासोबत घरात आहे. सध्या कुकिंगही शिकत आहे, शिवाय पुस्तकंही वाचतेय. नुकतीच तिला कुकिंगची आवड निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरात गोड शिऱ्याचा बेत असणार आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने दागिन्यांची, कपड्यांची खरेदी होते मात्र यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावाने घरीच थांबावं लागतयं. मात्र असं असलं तरी सोनाली घरीच हा सण साजर करणार असल्याचं म्हटली.
दरवर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी खरेदीचा उत्साह असतो. मात्र यावर्षी चित्र पाहायला मिळणार नाही. तसं असलं तरी घरातच या उत्सवाचं सेलिब्रेशन होईल यात शंका नाही.