By  
on  

नागराज मंजुळेंच्या 'नाळ'ची बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

सैराटफेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पहिली-वहिली निर्मिती आणि महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘नाळ' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफीसवर सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘नाळ' या सिनेमाने फक्त पहिल्याच आठवड्यात 14 कोटींचा विक्रमी गल्ला जमवला तर दुस-याच आठवड्यात 4.50  कोटींची त्यात आणखी भर पडली. आता हा आकडा 18.50 कोटींवर पोहचला आहे.

सबटायटलसह नाळ सिनेमा बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, सुरत, वडोदरा आणि चेन्नई या शहरांमध्ये इतर भाषिकांना आकर्षित करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आला आणि त्याने भरघोस य़शही मिळवलं. सिने व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नाळ सिनेमाला पैसे कमावून देणारा सिनेमा असं म्हटलं आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1067321615426285568

श्रीनिवास पोकळे या बालकलाकाराने सिनेमात आठ-नऊ वर्षांच्या दंगेखोर मुलाची भूमिका अप्रतिम साकारल्याचं पाहायला मिळतं. त्याच्या आणि आईच्या नात्यांचे विविध पैलू ‘नाळ' सिनेमात पाहायला मिळाले. नागराज मंजुळे यांनी चैतन्यच्या वडिलांची भूमिका सिनेमात साकारलीय. ही भाबडी कथा सिनेरसिकांसह लहान मुलांनासुध्दा प्रचंड भावली.

https://youtu.be/ILHwhVy-aR4

16 नोव्हेंबर रोजी ‘नाळ' प्रदर्शित झाला आणि अजूनही त्याची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घौडदौड सुरुच आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive