प्रिया बापट म्हणतेय, ‘राजमा चावल बनवतेय...आणि काय हवं’

By  
on  

करोनाने जगभर धुमाकुळ घातला आहे. करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन  घोषित केला  आहे. भारतातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे सर्वच सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर या करोनाशी दोन हात करतायत.

 सुजाण नागरिक म्हणून घरीच थांबून करोनाला पळवून लावण्यात सरकारला सहाय्य करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. घरी राहणं कितीही कंटाळवाणं वाटत असलं तरी घरीच राहा, सुरक्षित राहा. आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा घरीच राहून हा काळ त्यांच्या कुटुंबियांसोबत घालवत आहेत. 

मराठी सिनेसृष्टीतलं क्युट सेलिब्रिटी कपल म्हणून ओळखले जाणारे प्रिया बापट व उमेश कामतसुध्दा घरच्या घरी नानाविविध प्रकारे आपला वेळ घालवतायत. कधी बुध्दीबळ यांसारखे बैठे खेळ खेळून तर कदी घरच्या घरी होम फिटनेस वर्कआऊट करुन. नुकतंच प्रियाने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात प्रिया चविष्ट असा राजमा-चावल दुपारच्या जेवणासाठी तयार करताना पाहायला मिळतेय. तर तिला स्वयंपाकासाठी पती उमेशची भरपूर मदतसुध्दा होत असल्याचं तिने सांगितलंय. ती म्हणते, ‘मला स्वयंपाकात उमेशची मदत होतेय ....आणि काय हवं’. 

प्रियाच्या या नव्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्रिया आणि उमेशला स्वयंपाक करताना पाहून तुम्हालाही स्वयंपाकासाठी नक्कीच उत्साह येईल. 

दरम्यान,प्रिया-उमेश यांची  लोकप्रिय वेबसिरीज ‘आणि काय हवं’चा दुसरा सीझन अलिकडेच मॅक्स प्लेअरवर रसिकांच्या भेटीला आला आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share