पाहा Video : महेश मांजरेकरांना कधी जेवण बनवताना पाहिलय ? 

By  
on  

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचा घरात क्वारंटाईन टाईम सुरु आहे. सोशल मिडीयावर तर होम क्वारंटाइनचा जणू ट्रेंडचं आहे. सध्या सुरु असलेला लॉकडाउन लक्षात घेता सेलिब्रिटी मंडळीही आपल्या कुटुंबासोबत घरात वेळ घालवतेय. कुणी कुकिंग शिकतय, कुणी छंद जोपासतय तर कुणी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

sab haath bataao! swipe to see the final outcome

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

सध्या मनोरंजन विश्वातील चित्रीकरण, कार्यक्रम बंद असल्याने मराठी कलाकारही घरीच बसले आहेत. अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर लॉकडाउनमुळे आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवत आहेत. महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत महेश मांजरेकर चक्क स्वयंपाक घरात जेवण बनवताना दिसत आहेत. व्हिडीओत त्यांची मुलगी सई आणि पत्नी मेधाही दिसत आहेत. महेश मांजरेकरांना असं कुकिंग करताना याआधी कधी पाहिलेलं नसल्याने या पोस्टवर कमेंट्सचा आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

या लॉकडाउनमुळे बहुतांश लोकांना आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. आणि काही या संधीचं सोनं करत आहेत. तर काही या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करताना दिसत आहेत. 

Recommended

Loading...
Share