गश्मीर महाजनीचा हा व्हिडीओ पाहा, तुम्हाला जीममध्ये जाण्याची गरज भासणार नाही

By  
on  

सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये आरोग्याकडे लक्ष देणंही तितकच महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरात बसूनच व्यायाम आणि योगा करण्याकडे कित्येकांचा कल आहे. यातच सोशल मिडीयावर कलाकार मंडळी, फिटनेस ट्रेनर विविध व्हिडीओच्या माध्यममातून फिटनेस टीप्स देत आहेत.
अभिनेता गश्मीर महाजनी हा फिट कलाकारांपैकी एक आहे. गश्मीर महाजनी सुद्धा या लॉकडाउनमुळे त्याच्या घरीच आहे. त्यामुळे त्यालाही वर्कआउटसाठी जीममध्ये जाणं शक्य होत नाहीय. म्हणूनच गश्मीर घरातच व्यायाम करतोय. मात्र हे व्यायाम प्रकार इतरांनाही घरात बसून करता येतील यासाठी गश्मीरने एक छान युक्ती सुचवली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My Lockdown routine. तर वाट कसली बघताय? होऊ दे सुरू ...

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

मात्र जीममध्ये न जाता घरातच फिटनेसची काळजी कशी घेता येईल याविषयी तो सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगतोय. गश्मीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत गश्मीरने घरातच व्यायाम कसा करता येईल असे वर्कआउट करुन दाखवले आहेत. सध्याच्या क्वारंटाईन टाईममध्ये जीममध्ये न जाता कसं वर्कआउट करता येईल हे गश्मीर या व्हिडीओत सांगतोय. 

कलाकारांच्या अशा व्हिडीओमुळे घरात बसलेल्या कित्येकांना सकारात्मक दृष्टीकोन मिळतोय. शिवाय लोकांमध्ये जागरुकताही निर्माण होत आहे. 
  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

In the men’s room ... good morning

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

 

 

Recommended

Loading...
Share