By  
on  

या वेबसीरिजमध्ये झळकणार प्रिया बापट, नागेश कुकनूर करतोय दिग्दर्शन

मराठी सिनेसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने विशेष छाप पाडणारी गुणी अभिनेत्री अशी प्रिया बापटची ओळख आहे. प्रिया बापट नेहमीच हटके फॅशन आणि लूक्समुळे चर्चेत असते. तिचे विविध लूक्स ती सोशल मिडीयावरुन नेहमी शेअर करते. नुकतंच तिने आपल्या अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

प्रिया बापट लवकरच एका वेबसीरिजमध्ये झळकणार असून प्रसिध्द दिग्दर्शक नागेश कुककनूर याचे दिग्दर्शन करत आहेत. सिटी ऑफ ड्रीम्स असं या आगामी वेबसीरिजचं नाव आहे. यातील प्रियाची भूमिका पुन्हा एकदा हटके आणि आव्हानात्मक असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पौर्णिमा गायकवाड या महत्त्वाकांक्षी,बाणेदार आणि कणखर अशा मुलीची व्यक्तिरेखा प्रिया यात साकारणार आहे. या वेबसीरिजबाबत प्रियाने सोशल मीडियावर आपल्यालासुध्दा याची उत्सुकता असल्याचं म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/BqrJC2MB7Jd/

Author

Recommended

PeepingMoon Exclusive