लॉकडाउनमुळे सध्या सगळेच घरात बसून आहेत. मात्र या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी बहुतांश लोक विविध गोष्टी करत आहेत. कुणी छंद जोपासतय तर कुणी परिवारासोबत वेळ घालवत आहेत. अभिनेत्री उर्मिला कोठारेही घरात बसून मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग करत आहे.
उर्मिला ही उत्तम नृत्तयांगना आहे हे बहुतांश लोकांना माहित आहे. मात्र मुलगी जीजाच्या जन्मानंतर उर्मिलाला फिटनेसकडे तितकं लक्ष देता आलेलं नाही. म्हणून सध्या मिळालेल्या या वेळेचा उपयोग उर्मिला व्यायामासाठी करतेय. घरातच बसून उर्मिला सध्या वर्कआउट करतेय. मात्र लॉकडाउनमुळे सगळ्या जीमही बंद असल्याने फिटनेस फ्रिक सध्या घरातच व्यायाम करत आहेत. उर्मिलानेही तेच केलेलं आहे. फिटनेससाठी, व्यायामासाठी बरीच लोकं ऑनलाईन वर्कआउट ट्रेनिंगचा पर्याय निवडत आहेत. उर्मिलानेही हा पर्याय निवडला आहे. तिने तिच्य इन्स्टाग्राम अकाउंटवर या ट्रेनिंगचा व्हिडीयोही पोस्ट केला आहे. फिटनेससाठी उर्मिला बरीच मेहनत घेत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतय.
लॉकडाउनमुळे सध्या सोशल मिडीया आणि इंटरनेटचा वापर आणखी वाढलेला आहे. त्यातच त्याचा उपयोगही बऱ्याच गोष्टींसाठी केला जात आहे. ऑनलाईन वर्कआउटचा पर्याय उपलब्ध असल्याने बरेच कलाकार याचा वापर घरातच व्यायाम करण्यासाठी करत आहेत.