सध्या देशभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सर्व सरकारी यंत्रणा करोनाशी दोन हात करतायत. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. घरी राहा, सुरक्षित राहा असा नारा सर्वचजण देतायत. आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा या दरम्यान घरीच राहून कुटुंबासोबत वेळ घालवतायत. पण नुकतंच या क्वारंटाईन काळात 'कुंकू टिकली आणि टॅटू' फेम अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेने मात्र नसतेच उद्योग करुन ठेवले आहेत.
या खास वेळेचा उपयोग कोणी वाचनासाठी तर कोण घरकाम करण्यासाठी तर कोणाला जोपासायचे आहेत छंद. पण इथे भाग्यश्री मॅडमनी मात्र स्वतच्या पायाल दुखापत करुन घेण्याचा चांगलाच उद्योग केला आहे. याची माहिती फोटोसहित खुद्द तिनेच सोशल मिडीयावरुन चाहत्यांपर्यंत पोहचवली. या फोटोला भन्नाट कॅप्शनही तिने दिलं आहे,'Quarantine वाढीव उद्योग, Log down plus leg down'. यावर अनेकांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा धंम्माल वर्षाव केला आहे. एकजण म्हणतो, 'आधी फक्त घरी बसायचं होतं आता एका जागेवरच बसावं लागणार आहे.'
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिकपट अलिकडेच प्रदर्शित झाला. अजय देवगण आणि काजोलसोबतच यात काही मराठी कलाकारही झळकले आहेत. या कलाकारांमध्ये अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेचादेखील समावेश आहे. तिने सूर्याजी मालुसरेंच्या पत्नींची भूमिका साकारली.
मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने सूर्याजी मालुसरे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे
.
कुंकू, टिकली आणि टॅटू ही मालिका व 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या मराठी वेबसीरिजमध्ये झळकल्याने भाग्यश्री घराघरांत पोहचली.