सध्याच्या लॉकडाउनच्या काळात कलाकार मंडळी घरात बसून काहीना काही उद्योग करत आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून याविषयी सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. नेहमीच शुटिंगमध्ये व्यस्त असलेले हे कलाकार या निमित्ताने घरी बसून कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.
I made it . Feeling स्वावलंबी AF ! #poli #myfav #cantlivewithoutpoli pic.twitter.com/0YQQqA1Ike
— Sai (@SaieTamhankar) April 1, 2020
अभिनेत्री सई ताम्हणकरनेही सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती घरात बसून सध्या काय करतेय हे सांगीतलयं. सईने पोळीचा फोटो पोस्ट केला आहे. आणि या पोस्टमध्ये ती म्हणते की, “मी बनवली आहे, स्वावलंबी झाल्याची भावना आहे.” शिवाय सईला पोळ्या आवडत असल्याचही ती यात म्हणते. मात्र नुकत्याच एका वेब पोर्टलला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत सईने याविषयी उल्लेख केला होता. सईला पोळी बनवायला शिकायची प्रचंड इच्छा होती. तिला पोळ्या बनवता येत नसल्याचं आणि ती शिकायची इच्छा या मुलाखतीत व्यक्त केली होती. या क्वारंटाईनमध्ये ही इच्छा तिने पुर्ण केलेली पाहायला मिळतेय. म्हणूनच तिने जेव्हा पोळी बनवली तेव्हा सोशल मिडीयावर त्याचा फोटो पोस्ट केला.
बहुतांश कलाकार घरात बसून कुकिंगकडे वळले आहेत. ऐरवी चित्रीकरणात व्यस्त असलेल्या या कलाकारांना निवांत वेळ मिळाल्याने ते कुकिंगची आवड जोपासत आहेत. तर काही कुकिंक शिकत आहेत.