अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतले मोस्ट लव्हेबल कपल म्हणून ओळखले जातात. ते दोघंही रील आणि रिअल लाईफमध्येसुध्दा मेड फॉर इच ्अदरच दिसतात. महत्त्वाचं म्हणजे या गोड जोडीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक गोड बातमी नुकतीच चाहत्यांसोबत शेअर केली. अहो, कसली म्हणून काय विचारता, प्रियाने आप्लया इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक गोड बातमी म्हणत उमेशसोबतचा खुपच क्यूट फोटो शेअर केलाय.
प्रियाच्या या पोस्टवर क्षणार्धातच तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालाय. त्यामुळे प्रिया-उमेशच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार अशा चर्चा आता सर्वत्र रंगल्या आहेत. जे काही आहे, ते येणा-या काळात स्पष्ट होईलच.
दरम्यान, पिपींगमूनने काही महिन्यापूर्वीच ख-या आयुष्यातले हे जोडीदार लवकरच ऑनस्क्रीन एकत्र झऴकणार असल्याचे सांगितले होते . “अखेर आम्ही चार वर्षांनी एकत्र काम करतोय” ही आनंदवार्ता खुद्द उमेश कामतनेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली. पण त्यांच्या या आगामी प्रोजेक्टबाबतची सविस्तर माहिती अद्यापतरी गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे ही गुड न्यूज म्हणजे या दोघांचं आगामी प्रोजेक्ट असणार आहे.
https://www.instagram.com/p/Bqv9zbcBz1Q/
प्रिया आणि उमेश या दोघांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात काम करतायत. त्यामुळे दोघांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता आणि त्यामुळेच काम करता दोघांमध्ये मैत्रीचे बंधही निर्माण झाले. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २०११ मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले.
नवा गडी नवं राज्य हे सुपरहिट नाटकांमधून प्रिया-उमेश या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर आलेला टाईप्लीज हा त्यांचा सिनेमासुध्दा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यामुळे आता त्यानंतर चार वर्षांनी हे कपल एकत्र झळकतंय. आता ते नाटक असेल सिनेमा की मालिका याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.