पाहा 'डेट विथ सई'चा थरकाप उडवणारा ट्रेलर

By  
on  

सेलिब्रिटी म्हटलं की चाहते आलेच. चाहतावर्गाशिवाय सेलिब्रिटींना आपण सेलिब्रिटी म्हणूच शकत नाही. आपल्या आवडत्या नायक किंवा नायिकेवर चाहते जीव ओवाळून टाकतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी जीवाचा आटापीटा करतात. त्यांच्या सारखं दिसण्याचा वागण्याचा, त्यांच्यासारख्या वस्तू वापरण्याचा ते प्रयत्न करतात आणि आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या प्रत्येक कामाला मनापासून दाद देतात.

पण कधी आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी वेडा झालेला चाहता तुम्ही पाहिलाय का, नसेल तर तो थरकाप उडवणा-या चाहत्याच्या नाट्यमय घडामोडी तुम्हाला सई ताम्हणकरच्या 'डेट विथ सई' या आगामी वेबसीरिजमधून अनुभवता येतील. महत्त्वाचं म्हणजे या वेबसीरिजमध्ये सई स्वत:च्याच म्हणजे सई ताम्हणकरच्याच भूमिकेत पाहायला मिळेल.

एका वेड्या चाहत्याचं प्रेम कसं जीवावर बेतू शकतं, हे 'डेट विथ सई' या  झी5 च्या वेबसीरिजमध्ये पाहणं उत्कंठावर्धक असेल एवढं मात्र नक्की!

https://twitter.com/ZEE5Marathi/status/1068023296958984192

Recommended

Share